Omraje Nimbalkar : ठाकरे गटाच्या फुटीबाबतच्या पत्रावर सही केलीय का? ओमराजेंच्या उत्तराने ऑपरेशन टायगरचा सस्पेन्स वाढवला..!


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.21 जून 2026.

पुणे: शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी बंड करत पक्षात फू़ट पाडल्याच्या चर्चांना आता अधिकच वेग आला आहे. आज सायंकाळपर्यंत लोकसभा अध्यक्षांकडून पुरावे सादर केले जाणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

अशातच मध्यरात्री ठाकरेंच्या आमदारांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ओमराजे निंबाळकर आज धाराशिवसाठी रवाना झाले आहे. त्याआधी पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या एका उत्तराने ऑपरेशन टायगरचा सस्पेन्स वाढला आहे.

धाराशिवसाठी पुण्याहून निघण्याआधी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ओमराजे यांनी म्हटले की, मी धाराशिवला आज जात आहे. आज सायंकाळी ४ वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. सगळ्यांची चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे त्यांनी म्हटले. २० वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच यातनांना आम्हाला सामोरे जावे लागत असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सीबीआय हायकोर्टात जाणार आहे. हायकोर्टाने न्याय द्यावा अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.
पत्रावर सही केलीय का, ऑपरेशन टायगरचा सस्पेन्स वाढला….

आज ठाकरे गटाच्या ६ बंडखोर खासदारांनी पत्र दिल्याचे सांगितले जाते. या पत्राच्या आधारे ठाकरे गटात फूट पडणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर, दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्यापर्यंत मातोश्रीचा निरोप पोहचवण्यात आला आहे. अशातच लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर आपली सही आहे का, असा सवाल ओमराजे निंबाळकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य न करता आपण रात्री सगळं जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. सही बाबत ओमराजे यांनी दिलेल्या उत्तराने मात्र,म

आपण कधीही मातोश्रीविरोधात बोललो नाही आणि बोलणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांनी आपल्याला कठीण काळात साथ दिली असल्याचे ओमराजे यांनी म्हटले. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काही बोललोच नाही, तरी देखील ते मी बोललो असल्याचे छापले गेले, असे ओमराजे यांनी म्हटले. मी राजकीय जीवनात वडिलांच्या हत्याकांडामुळे आलो.एका व्यक्तीला मारल्याने राजकीय विरोधक संपत नसतो हे राजकीय विरोधकांना दाखवून द्यायचे होते, असे त्यांनी म्हटले.

धाराशिव मतदारसंघात होत असलेल्या राजकीय कोंडीबाबत ओमराजे निंबाळकरांनी भाष्य केले. माझ्या लोकसभा मतदारसंघात माझी एकही पंचायत समिती, नगरपालिका जिंकता आली नाही. कैलास पाटील, प्रवीण स्वामी, दिलीप सोपल यासारख्या आमदारांच्या मतदारसंघातही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळाले नाही. आम्ही एवढे वाईट आहोत का, असा सवालही त्यांनी केला.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!