संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीचा निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने 100 चा आकडा पार केला आहे. या युतीला 118 जागा मिळाल्या आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे आणि मनसे मिळून 65 जागांवर स्थिर आहे.
त्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, आहे. ठाकरेंनी मुंबई महापालिका गमावली आहे.
भाजप तब्बल 90 जागांवर तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 28 जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 57 जागांवर तर, मनसे नऊ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसची कामगिरी देखील खालावली असून अवघ्या 15 जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेंची शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे चित्र आहे.
शिंदेंची ताकद वाढली
मुंबईमध्ये ठाकरेच अशी हवा होती. मात्र, भाजपच्या साधीने निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदेंनी तब्बल 28 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. या आघाडीचा थेट फटका ठाकरेंच्या उमेदवारांना बसला आहे.प्रथमच भाजपचा महापौर
भाजप शिवसेनेसोबत मुंबईत महापालिकेत अनेकदा सत्तेत होती. मात्र, त्यांना उपमहापौर पदावर समाधान मानावे लागत होते. या वेळी मात्र यावेळी शिंदेंसोबत लढत भाजपने एकहाती वर्चस्व स्थापन करत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे प्रथमच भाजपचा महापौर होणार आहे.









