संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सूचनेनुसार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे – कार्याध्यक्ष: गणेश सोनवणे, संभाजी माने, सयाजी गायकवाड, रियाज शेख. उपाध्यक्ष: ऋषिकेश निलाखे, नानासो भगत, संतोष टाटीया, छगन आटोळे, सचिन काकडे, संजय गुळुमकर, सोमनाथ नाळे, अन्सार आत्तार सरचिटणीस : ॲड. शिवकांत वाघमोडे, शैलेश वणवे, सुशिल राठोड, धनंजय जमदाडे, वैभव बोरसे, मुकुंद तारु, ॲड. वैभव काळे, रोहित शहा. चिटणीस: सुधीर पोतदार, सचिन सकट, प्रशांत महाडिक, नवनाथ चौधर, राजू मदारी, सुभाष मोहिते, कैलास शिंदे, शंतनु बनकर
तसेच विविध आघाड्यांवर पुढीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या : ओबीसी सेल अध्यक्ष: नवनाथ अपुणे. उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष : प्रविण आहुजा. आय.टी. सेल अध्यक्ष : संजय दुधाळ.
सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष : गजानन गायकवाड. ग्राहक संरक्षण समिती सेल अध्यक्ष : हारुण शेख. सेवा दल अध्यक्ष : ॲड. धिरज लालबिगे. विद्यार्थी सेल अध्यक्ष : मेघराज माने
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी जाहीर करताना स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी दिली. विविध पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवून शहरातील पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, शहर पक्ष कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते तसेच विद्यार्थी सेल अध्यक्ष मेघराज माने आदी उपस्थित होते.
महिला शहराध्यक्ष, युवती शहराध्यक्ष, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष व इतर प्रलंबित सेलच्या अध्यक्षांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी माध्यमांना दिली.









