अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबात मोठा निर्णय; सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांवर जबाबदाऱ्यांचे वाटप


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – (ता.24)राज्यात आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाची रणनीती आखण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबात जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी तीन स्तरीय फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.

या नव्या रचनेनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षाचा प्रमुख चेहरा असतील. त्या संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणार असून, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर देणार आहेत.

दरम्यान, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे मुंबईसह दिल्लीतील राजकीय समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क वाढवणे आणि मुंबईतील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेल.

तर बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची जबाबदारी जय पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवणे आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर असणार आहे.

या नव्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. कौटुंबिक एकजूट दाखवत पक्षाची विस्कळीत घडी बसवण्याचा प्रयत्न सुरू असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!