प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ सिनेमाने ४ आठवड्यांत किती कोटींची केली कमाई? पोस्ट शेअर करत म्हणाले, “हे यश.”


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.२० जून २०२६.

देऊळ बंद २’ हा सिनेमा २१ मे २०२६ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमात स्नेहल तरडे, मोहन जोशी, अतुल कुडळे, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. ‘देऊळ बंद २’सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासूनच सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता २७ दिवसांत या सिनेमाने किती कमाई केली आहे, याबद्दल जाणून घेऊ…

‘देऊळ बंद’ या सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमात शेतकऱ्यांची गोष्ट पाहायला मिळत आहे. फक्त कलाकारांनीच नाही तर प्रेक्षकांनाही या सिनेमाचे कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडे, स्नेहल तरडे त्यांच्या टीमस विविध शहरातील थिएटर मध्ये जाऊन प्रेक्षकांना भेटत असल्याचे दिसत आहे. तसेच, प्रवीण तरडे सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचा सिनेमाला कसा प्रतिसाद मिळत आहे, याबद्दल बोलतात. तसेच, सिनेमाने किती कमाई केली, याबद्दलही ते सांगतात. आता नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

*प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ सिनेमाने ४ आठवड्यांत किती कोटींची केली कमाई?*

प्रवीण तरडेंनी देऊळ बंद सिनेमाने २९ व्या दिवशी म्हणजेच चार आठवड्यात एकूण किती कमाई केली आहे, हे सांगितले आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर, “फक्त चार आठवड्यात ८९.४० कोटी”, लिहिले आहे. तसेच, ही पोस्ट शेअर करताना प्रवीण तरडेंनी लिहिले, “हे यश खऱ्या मराठी रसिक मायबाप प्रेक्षकांना आणि माझ्या प्रिय स्वामी भक्तांना समर्पित.”


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!