अमानुष आणि संतापजनक कृत्य! चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने निर्घृण हत्या नराधमाने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

भोर – साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून खून केला. क्रूरतेचा कळस म्हणजे दगडाने ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याची धक्कादायक घटना नसरापूर (ता.भोर) परिसरात उघडकीस आली असून, पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्हाळ्याच्या सुटीसाठी चिमुकली आजीकडे आली होती. दरम्यान शुक्रवारी नराधमाने तिला आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्याकडे नेले. ४ वाजेपर्यंत मुलगी घरी परत न आल्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. त्याचवेळी गावातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात आरोपी मुलीला घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला आणि बनेश्वर फाट्यावरून पकडून आणून चोप दिला. चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा सांगितली. २ शेणाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरला होता. चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.

आरोपीला ताब्यात द्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अडवला. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेतला.

आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे

भीमराव प्रभाकर कांबळे (६५) हा मूळचा भोर तालुक्यातील साळवडे येथील रहिवासी आहे. साळवडे गावाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावाबाहेर काढले होते. तो नसरापूर बाजारपेठेच्या ठिकाणी मोलमजुरीसाठी येत असे. आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे दाखल आहेत. १९९८ आणि २०१५ साली बलात्काराचे गुन्हे दाखल असून आरोपीने ४ वर्षे कारावास भोगला आहे. सध्या कुणाच्या बांधकामावर, तर कोणाच्या शेतात मोलमजुरी करीत असे.

नसरापूर घटनेप्रकरणी नागरिकांनी मुंबई-पुणे हायवेवर आंदोलन केले होते, त्यामुळे वाहतूककोंडी झाली होती.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!