संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी रोहित माने
बारामती – बारामतीत ‘फटाका बुलेट’ वर कडक कारवाईविशेष मोहिमेत अनेक अवैध सायलेंसर जप्त, तसंच काळया काचा लावलेल्यांवर आणि नंबर प्लेट नसलेल्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली .
बारामती शहरात काही दिवसांपासून बुलेट मोटारसायकलींना फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे अवैध सायलेंसर बसवण्याची प्रवृत्ती वाढली होती. या अतिआवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. सतत होत असलेल्या त्रासामुळे अनेक नागरिकांनी बारामती वाहतूक शाखेकडे लेखी आणि मौखिक तक्रारी नोंदवल्या होत्या.
त्यामुळे बारामती वाहतूक शाखेकडून शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान बारामती सम्येक चौकात काळया काचा बिगर नंबर प्लेट आणि शहरातील विविध भागांत गस्त वाढवून ‘फटाका बुलेट’ चालवणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान अनेक बुलेट रायडर्सकडून अवैध सायलेंसर काढून जप्त करण्यात आले. तसेच आवाज वाढवणारे सायलेंसर जागीच बदलण्याचे आदेश देण्यात आले. अनेक वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
या विशेष मोहिमेचे नेतृत्व पोलिस निरीक्षक निलेश माने यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक काळे, तसेच पोलिस अंमलदार शिरतोडे मॅडम, प्रविण सांगळे, श्रीधर कांबळे, टेंबरे मॅडम, आणि होमगार्ड खोमणे, खारतोडे यांनी संयुक्तपणे ही कारवाई अंमलात आणली.
शहरातील शांतता आणि नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन अशा प्रकारच्या बेकायदेशीर बदलांपासून दूर राहावे, नाहीतर कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले..









