बारामतीची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली


बारामती :- बारामती नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबरला होणार होती मात्र आता बारामतीतील अभिजीत कांबळे यांनी याबाबत बारामती कोर्टात याचिका दाखल केली यानंतर आता ही निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली .

अभिजीत कांबळे यांनी नगराध्यक्ष पदासह तब्बल सात नगरसेवकांच्या विरोधात न्यायालयामध्ये आक्षेप नोंदवला होता.

राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्या अतिक्रमणाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले होते आणि याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्ते अभिजीत कांबळे यांनी दिली आहे. ते म्हणाले की राष्ट्रवादीचे सचिन सातव यांनी बारामती नगरपालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेत आणि त्यांचे जे जागा आहेत शोरूम आहेत महालक्ष्मी फलटण रोडला त्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या एक एकर मध्ये अतिक्रमण केलेत आणि सार्वजनिक ठिकाणीचा रोड त्यांनी जाण्या येण्यास मज्जाव केलाय म्हणजे बंद करून टाकलाय येण्या जाण्यास कोणाला मज्जाव नाही स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी करून घेतली आणि ते रोड कोणी केल्यात तर बारामती नगरपरिषदेने ते केल्यात तिथे स्ट्रीट लाईट कोणी टाकली तर बारामती नगरपालिकेने दिली आता सर्वप्रथम आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊन या बाबतीमध्ये वकिलां मार्फत अभ्यास करून पुढचं पाऊल आम्ही उचलणार आहे . असं अभिजीत कांबळे म्हणाले


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!