संपादक – गणेश जाधव
उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यात एक अजब घटना घडली. पाणीपुरी खाण्यास गेलेल्या एका महिलेला जबडा एकाएकी सरकला. त्यामुळे तिच्या समोर विचित्र समस्या निर्माण झाली. जबडा सरकल्यानं तिला तोंड बंद करता येत नाहीए.महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण महिलेचा जबडा अद्यापही पूर्ववत झालेला नाही.
जबडा सरकल्यानंतर महिलेला प्राथमिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण समस्या कायम राहिल्यानं तिला हायर सेंटरमध्ये हलवण्यात आलं. वेदना असह्य झाल्यानं महिला कळवळत होती. जबडा बंद होत नसल्यानं तिला प्रचंड त्रास सुरु आहे. महिलेच्या सोबत असलेले नातेवाईकदेखील चिंतेत आहेत. त्यांची अवस्थादेखील दयनीय झाली आहे.
दिबियापूरच्या गोरी किशनपूर गावात वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षीय इकला देवी कामानिमित्त औरैयाला गेल्या होत्या. कामं आटोपल्यावर त्या एका दुकानात पाणीपुरी खाण्यास गेल्या. पाणीपुरी खाण्यासाठी त्यांनी तोंड उघडताच त्यांचा जबडा सरकला. यामुळे महिलेचं तोंड उघडच राहिलं. तिनं बराच वेळ प्रयत्न केले. पण तिला तोंड बंद करता आलं नाही.
महिलेला तीव्र वेदना होऊ लागल्या. तिला संयुक्त रुग्णालय औरैयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. पण पीडितेला आराम पडला नाही. परिस्थितीचं गांभीर्य पाहता प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी इकला देवी यांना हायर सेंटरमध्ये हलवलं. तिथे आता इकला देवी यांच्या उपचार सुरु आहेत. महिलेला अद्यापही बोलता येत नाहीए.
गावाकडे राहणाऱ्या इकला देवी काही कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्या होत्या. कामं पूर्ण झाल्यावर त्या गावाकडे परतणार होत्या. कामं आटोपून त्या पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या. तिथे त्यांनी पाणीपुरीवर अगदी आडवा हात मारला. पाणीपुरीचा फडशा पाडताना अचानक त्यांचा जबडा सरकला. त्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली. इकला देवी यांना बोलताही येत नसल्यानं त्यांचे कुटुंब चिंतेत आहेत. गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांनी शहरात धाव घेतली आहे.








