संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाला आहे, पण अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि त्या रात्री घडलेले प्रसंग आता समोर येत आहेत. दादांचे अत्यंत विश्वासू आणि गेल्या 12 वर्षांपासून सावलीसारखे सोबत असणारे त्यांचे खासगी वाहनचालक शामराव मणवे यांनी अपघाताच्या आदल्या रात्री नक्की काय घडलं होतं, याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
अपघाताच्या आदल्या रात्री म्हणजेच मंगळवारी कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर दादा रस्तेमार्गाने पुण्याला आणि तिथून बारामतीला जाणार होते. सकाळी 10 वाजता बारामतीत त्यांच्या सभांचे नियोजन होते. “गाडीत बॅगाही ठेवल्या होत्या,” मंत्रालयातील बैठकीला उशीर झाल्यामुळे शेवटच्या क्षणी दादांनी निर्णय बदलला आणि सकाळी थेट विमानाने बारामतीला जाण्याचे ठरवले. दादांनी मणवे यांना सांगितलं, “तू गाडी घेऊन पुण्याला जा, मी बारामती आटोपून तिथे येतो.” असे दादांनी सांगितले.
“दादांचे वेळेचे नियोजन इतके अचूक होते की, त्यांनी 6 ची वेळ दिली तर आम्ही 5:30 लाच तयार असायचो. लोकांना ते रागीट वाटायचे, पण ते फक्त शिस्तीचे कट्टर होते. विनाकारण ते कोणावरही ओरडत नसत,” असं मणवे आठवणींना उजाळा देताना म्हणतात.









