१० बिअर, ४५ झोपेच्या गोळ्या; डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल, नर्स ठरली कारण


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

डोंबिवली – डोंबिवलीमधील एका नामांकीत रूग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टराने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

त्याने १० बिअर, ४५ झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला पण या घटनेमुळे डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरची पत्नी देखील डोंबिवली शहरातील एक नामांकित डॉक्टर आहे.

स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरचे एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. संबंधित नर्स लग्नासाठी वारंवार तगादा लावत होती. त्यामुळे डॉक्टर मानसिक तणावात होता. त्यामधून डॉक्टरने १० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या या प्रकरणाचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत. प्रेमसंबंधांतून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. डॉक्टरवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

रुग्णालयातील एका नर्ससोबत असलेल्या प्रेमसंबंधातून  त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नामांकित रुग्णालय आहे. पती-पत्नी दोघेही डॉक्टर असून एकत्र रुग्णालय चालवतात. संबंधित डॉक्टर रुग्णालयात न आल्याने त्यांना वारंवार फोन करण्यात आले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांच्या घरी गेले असता, कसाबसा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी डॉक्टर बेशुद्धावस्थेत खाली पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरचे रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. या वादाला कंटाळून डॉक्टर डोंबिवली पूर्वेतील एका हायफाय सोसायटीत घर घेऊन स्वतंत्र राहू लागले. दरम्यान, संबंधित नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यावर “माझे लग्न झाले आहे, मी तुझ्याशी लग्न कसे करू?” असे डॉक्टरने तिला विचारले. या कारणावरून नर्सने डॉक्टरांशी बोलणे बंद केले. प्रेयसीने बोलणे बंद केल्यामुळे व्यथित झालेल्या डॉक्टरने १० बिअर आणि ४५ झोपेच्या गोळ्या खाऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!