बारामतीत सांगता सभा;महायुतीच्या मंचावर सुप्रिया सुळे भावूक


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती -( ता.21)संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज महायुतीकडून सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महाविकास आघाडीकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली.

या सभेत भाषणावेळी सुप्रिया सुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व दादाप्रेमींचे धन्यवाद. घरातला कर्ता पुरुष आपल्यात नाही हे दु:ख मनात आहे. गेले दोन – अडीच महिने सर्वांसाठीच अडचणीचे होते. अजितदादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसणं कठीण आहे. सुनेत्रा वहिनींना मी महाविकास आघाडीकडून शब्द देते की, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता सुनेत्रा वहिनींसोबत ताकदीनं उभा राहिलं.

अजितदादांनी बारामतीची एक वेगळी ओळख राज्याच्या राजकारणात स्थापन केली आहे. अजितदादांनी 35 वर्षे बारामतीची सेवा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मतदान होणार याबद्दल शंका नाही. याच बारामतीकरांनी 6 दशके पवार साहेबांना निवडून आणलं आहे.

माझी इच्छा होती ही निवडणूक बिनविरोध व्हावी. जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हाच आम्ही सुनेत्रा पवारांना पाठींबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती असं या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामती पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात या निवडणुकीत काँग्रेसकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या विनंतीनंतर काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!