आपला मोठा धक्का! राघव चड्ढा यांच्यासह ७ राज्यसभा खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून राघव चड्ढा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्षात विलीन होण्याची घोषणा केली. त्यांच्या सोबत राज्यसभेतील दोन तृतीयांशपेक्षा अधिक खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चड्ढा म्हणाले की, “आम आदमी पक्ष आपल्या मूळ आदर्शांपासून आणि सिद्धांतांपासून दूर गेला आहे. गेल्या काही वर्षांत मला चुकीच्या पक्षात योग्य माणूस असल्याची जाणीव झाली. त्यामुळे जड अंत:करणाने हा निर्णय घेतला.” त्यांनी पुढे सांगितले की, “आता मी पक्षापासून दूर जाऊन थेट जनतेच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

विशेष म्हणजे, राज्यसभेत आपचे उपनेते म्हणून नुकतेच नियुक्त करण्यात आलेले अशोक कुमार मित्तल यांचाही या निर्णयात समावेश आहे. राज्यसभेत आपचे एकूण १० खासदार असून त्यापैकी ७ खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात आले.

विलिनीकरणासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे चड्ढा यांनी सांगितले. सातही खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला संदीप पाठक यांच्यासह अन्य खासदारही उपस्थित होते. पक्षात “प्रचंड घुसमट” होत असल्याचा आरोप करत चड्ढा यांनी सांगितले की, “पूर्वी देशहिताचा विचार करणारा पक्ष आता वैयक्तिक फायद्यांवर भर देत आहे.”

आप सोडणारे खासदार:

1.राघव चड्ढा

2.स्वाती मालीवाल

3.अशोक कुमार मित्तल

4.संदीप पाठक

5.हरभजन सिंह

6.बलबीर सिंह सीचेवाल

7.विक्रमजीत सिंह साहनी

या घडामोडींमुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!