पुण्याच्या लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – पुण्यातून एक खळबळजनक महिती समोर आली आहे. पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डेक्कनच्या एका लॉमध्ये विष प्राशन केल्याने जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचं निर्णय घेतल्याने पोलीस विभागात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सूरज मराठे आहे. ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहे. आजरपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. डेक्कनच्या लॉजमध्ये जाऊन पोलिस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 25 व्या वर्षी पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.

आजारपणामुळे कंटाळले आणि उचललं टोकाचं पाऊल

सूरज मराठे यांचे कुटुंब देहू येथे वास्तव्यास आहे. ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गुडघ्यांच्या वेदनांमुळे ते त्रस्त होते. गुडघ्यांच्या दुखण्यामुळे ते उपचारासाठी ते पुण्याला येत होते. गुडघ्यांवरील उपचारासाठी त्यांनी रजा घेतली होती. पुण्यात आल्यानंतर ते उपचारासाठी डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये थांबले होते. उपचार केल्यानंतर ते रुमवर आले आणि त्यांनी विष प्राशन करत आयुष्य संपवले.

पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली

घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली असून, त्यामध्ये आजारपणाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र चिठ्ठीतील मजकूराबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात शोककळा पसरली आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!