ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन- चित्रपट सृष्टीतील एक युग संपले


संपादक – गणेश जाधव मुंबई:- काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर श्वसनाचा त्रास बळावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर देखील ठेवण्यात आले होते.

मात्र 10 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि खळबळ उडाली. पण त्यांच्या कुटुंबीयांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले, तसेच धर्मेंद्र यांची तब्येत सुधारत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दुसऱ्या दिवशी धर्मेंद्र यांना त्यांच्या राहत्या घरी नेले होते. मात्र आज (24 नोव्हेंबर) धर्मेंद्र यांच्या या मृत्यूची बातमी समोर आली आणि सर्वांना धक्का बसला आहे.

त्यांचे वय ८९ वर्षे होते. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले.उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरीही आणण्यात आले होते. धर्मेंद्र यांचे अनेक चित्रपट सुप्रसिद्ध ठरले आहेत. धर्मेंद्र यांचा प्रवास मात्र सोपा नव्हता. जेव्हा ते आले, त्यावेळी दिलीप कुमार-देव आनंद-राज कपूर ही त्रिमूर्ती आपल्या शिखरावर होती. १९६० मध्ये धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट आला- ‘दिल भी तेरा हम भी तेरे’.त्यांचा ‘शोले’ हा चित्रपट चित्रपटसृष्टीत जबरदस्त चित्रपट ठरला

याच वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ‘मुगल-ए-आझम’ प्रदर्शित झाला. पुढच्या वर्षी ‘गंगा’ नावाच्या दोन चित्रपटांनी धुमाकूळ घातला-राज कपूर यांचा ‘जिस देश में गंगा बहती है’ आणि दिलीप कुमार यांचा ‘गंगा जमुना’. चार वर्षांनी देव आनंद यांचा ‘गाईड’ आला. त्यादरम्यान शम्मी कपूरचा ‘तुम सा नहीं देखा’, ‘जंगली’ आणि राजेंद्र कुमार यांचा ‘जुबिली’ काळ सुरू होता.सात दशकं चमकलेला हा तारा जणू शांतपणे आकाशातून गायब झाला.

एक युग संपले… पण त्यांची युगप्रभा कायम आहे. खरेतर धर्मेंद्र यांच्या युगाचा अंत आधीच झालेला होता. पण त्यांच्या निधनामुळे पुन्हा जाणीव होते, की एक संपूर्ण युग त्यांचेही होते.आणि जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल.धर्मेंद्र हे नाव पहिल्या रांगेत सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!