मोहित गजानन जाधव यांचा आदर्श उपक्रम : वाढदिवसानिमित्त ४० ब्लॅंकेटचे वाटप


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे माननीय श्री. मोहित गजानन जाधव (महाराष्ट्र पोलीस) यांनी. आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत त्यांनी गोरगरिबांसाठी ४० ब्लॅंकेटचे वाटप करून एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवला.

सध्या थंडीचा कडाका वाढलेला असताना फुटपाथवर, मंदिर परिसरात, हॉस्पिटलजवळ, एसटी स्टँड व रेल्वे स्टेशन परिसरात झोपणाऱ्या गरजू, गरीब नागरिकांना मायेची ऊब मिळावी या हेतूने हे ब्लॅंकेट वाटप करण्यात आलं. या उपक्रमामुळे अनेक निराधारांच्या चेहऱ्यावर दिलासा व समाधान दिसून आलं.

सामाजिक हित जोपासणाऱ्या जाधव घराण्याची परंपरा पुढे नेत, मोहित जाधव यांनी आपल्या वडील कै. गजानन जाधव यांचा सामाजिक सेवेचा वारसा जपला आहे. केवळ कर्तव्यापुरती मर्यादित न राहता, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येते.

याच उपक्रमात सामाजिक कार्यात ठसा उमटवणारे गौरव जाधव यांनीही सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली. वाढदिवसानिमित्त बोलताना मोहित जाधव म्हणाले, “इथून पुढेही आम्ही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत राहू. गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मिळते, हे मी माझं भाग्य समजतो. ही सेवा निरंतर सुरू राहील.” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या उपक्रमासाठी त्यांना मोठ्या भावाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच बबलू दास, सिद्धार्थ गाडे, ओंकार जाधव, ऋतिक कांबळे, अभिषेक साठे हे सहकारी उपस्थित होते.

समाजसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत साजरा केलेला हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!