बारामतीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट बंद होण्याकरिता बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती शहर व तालुक्यात हातभट्टी दारू, मटका-जुगार, ऑनलाईन चक्री मटका, गुटखा विक्री, गांजा, ताडी विक्री, मुरुम-वाळू तस्करी, चोरीचं सोनं खरेदी-विक्री, चोरीच्या वाहनांचा स्क्रॅप व्यवसाय, चोरीचं भंगार, ओव्हरलोड वाहतूक तसेच जुन्या वाहनांची बेकायदेशीर खरेदी-विक्री अशा विविध अवैध धंद्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप करीत बारामती शहरात सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे.
या उपोषणात शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय वास्तद (पप्पू) माने, ॲड. आकाश दामोदरे, फिरोज तांबोळी, शहाजी कदम, मुकेश वाघेला, शशिकांत खरात यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये
➡️ बारामतीतील सर्व अवैध धंदे तात्काळ, कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत
➡️ कैकाडी समाज, तांबोळी समाज व मेहतर वाल्मिकी समाजासाठी स्वतंत्र समाजमंदिर उभारण्यात यावे
➡️ बारामती नगरपरिषदेच्या मालकीच्या जमिनींवर धनदांडग्यांनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे तात्काळ हटवावीत
या मागण्यांचा समावेश आहे.
उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला थेट इशारा देताना सांगितले की,
“जोपर्यंत वरील सर्व अवैध धंदे पूर्णपणे व कायमस्वरूपी बंद होत नाहीत, तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहील.”
हफ्ता की थेट पार्टनरशिप?
बारामतीतील अवैध धंदे केवळ संरक्षणाखाली सुरू नसून, लाखो रुपयांचा ‘हफ्ता’ किंवा थेट पार्टनरशिप मॉडेलद्वारे चालवले जात असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
➡️ हे हफ्ते नेमके कोण गोळा करतात?
➡️ कोणते कर्मचारी या धंद्यांना संरक्षण देतात?
➡️ गोळा होणारा पैसा कुणाच्या खिशात जातो?
असे गंभीर प्रश्न उपस्थित करीत उपोषणकर्त्यांनी पोलिस व प्रशासनावर थेट आरोप केले आहेत.
बेहिशोबी मालमत्तेची चौकशी होणार का?
या कथित हफ्ता-पार्टनरशिपमधून तयार झालेल्या बेहिशोबी मालमत्तेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक देतील का? असा थेट सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे.
नागरिकांत उत्सुकता वाढली
उपोषणकर्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे बारामती शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
उपोषणकर्ते म्हणाले,
“लवकरच सर्व पुरावे जनतेसमोर ठेवून अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला जाईल. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर गुन्हेगारीचे साम्राज्य अधिकच वाढेल.”
दरम्यान,
👉 प्रशासन कडक कारवाई करून अवैध धंदे बंद करणार का?
👉 की पुन्हा एकदा मूकबधिराची भूमिका घेणार?
याकडे संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!