दोन्ही राष्ट्रवादी बारामतीतही एकत्र लढणार; सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती- राज्यभरात महानगरपालिकानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे.एकत्रित लढण्याबाबत चर्चा, बैठका सुरू झाल्या आहेत, अशातच बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांकडे 3 जिल्हा परिषद तर 6 पंचायत समितीच्या जागा मागितल्या असल्याची माहिती समोर आली आहे. जर युती झाली तर शरद पवारांची राष्ट्रवादी घडयाळच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. इंदापूरमध्ये शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाचे शिष्टमंडळ अजित पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. आज एकत्रित लढण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवार आणि शरद पवार गटाच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबची माहिती दिली आहे. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा देणार हे देखील गुलदस्त्यात आहे, मात्र शरद पवारांच्या पक्षाची 3 जिल्हा परिषद तर 6 पंचायत समिती अशी मागणी आहे.मात्र शरद पवार गटाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!