पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दौंड-गोपाळवाडी रस्त्याचे काम सुरू असताना एका चार वर्षाच्या मुलाचा रोड रोलर खाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आर्यन जाधव असं या चार वर्षाच्या मुलाचं नाव आहे. काल गुरुवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील जनता कॉलनी भागातील सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील दौंड-गोपाळवाडी रस्त्याचे काम सुरू असताना, आर्यन जाधव या चार वर्षाच्या मुलाचा रोड रोलर खाली सापडून चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल गुरुवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आईच्या पाठीमागे हा चिमुरडा चालत निघालेला होता, एका सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद देखील झाला आहे. आईच्या मागे चालत असताना याच दरम्यान रॉड रोलर मागे घेणाऱ्या चालकाला अंदाज न आल्याने तो मुलगा रोलरच्या खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणानंतर रोड रोलर चालक पळून गेला
आर्यनची आई डांबरीकरणाच्या कामावर मजूर म्हणून काम करत होती. रोड रोलर चालकाचा रोलर फिरवण्याचा वेग जास्त होता लवकर काम उरकण्याच्या नादात त्याच्या रोलर खाली सापडून आर्यन जाधव याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणानंतर रोड रोलर चालक पळून गेला आहे. या प्रकरणी बांधकाम विभागाकडून रस्ता वाहतुकीसाठी बंद न करता डांबरीकरण सुरू होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण करत असताना रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करणे सूचना फलक लावणे, कठडे उभारणे सुरक्षात्मक उपाय करणे या कोणत्या उपयोजना केल्या नाहीत असा आरोप केला जात आहे.
आईच्या डोळ्यादेखतच पोटच्या गोळ्याचा मृत्यू, परिसरात हळहळ
दरम्यान, आईच्या डोळ्यादेखतच पोटच्या गोळ्याचा मृत्यू झाल्यानं सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी आर्यनची आई डांबरीकरणाच्या कामावर मजूर म्हणून काम करत होती. आईच्या पाठीमागे हा चिमुरडा चालत निघालेला होता, एका सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद देखील झाला आहे. आईच्या मागे चालत असताना याच दरम्यान रॉड रोलर मागे घेणाऱ्या चालकाला अंदाज न आल्याने तो मुलगा रोलरच्या खाली गेला, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.









