10 मिनिटांआधी अजितदादा नेमकं काय म्हणाले होते?, कार्यकर्त्याने कॉल रेकॉर्डिंग ऐकवली!


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते.

यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली.

अखेरच्या कॉलमध्ये श्रीजीत पवारांसोबत अजित पवारांचं संभाषण झालं होतं. श्रीजीत पवारांनी केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करुन उत्तर दिलं. विमानाचं बारामतीमध्ये लँडिंगआधी अजित पवारांनी नेटवर्क आल्यानंतर श्रीजीत पवारांना कॉल केला होता.अजित पवारांच्या विमानाचा अपघात सकाळी 8.46 वाजता झाला होता. त्याआधी 8 वाजून 37 मिनिटाला अजित पवारांनी श्रीजीत पवार पवारांना कॉल केला होता. या कॉलमध्ये सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवारांची भूमिका होती आणि याबाबतच अजित पवार श्रीजीत पवारांसोबत फोनवर बोलत होते.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी बाबत श्रीजीत पवार आणि अजित पवारांचं शेवटचं बोलणं झालेलं. यामध्ये सर्व जाती धर्म सोबत आपण राहत आहोत सगळ्यांना न्याय देण्याचा पण काम करू , असं अजित पवार श्रीजीत पवारांना म्हणाले. तसेच माळी समाजाला मी जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे. बाकीचे कोणी दिली नाही, इतर पक्षांनी कोणी दिले नाही आपण ती दिलेली आहे, असं अजित पवार फोनवर बोलत आहेत.

अजित पवार यांचा लास्ट कॉल 8 वाजून 37 मिनिटांनी आहे. एका विषयावर मी अजित पवार यांच्याशी बोलणार होतो. 8.19 मिनिटांनी मी अजित पवार यांना मेसेज केला. रेंजमध्ये मेसेज मिळताच मला अजित पवार यांनी मला फोन केला. 8.37 वाजेपर्यंत अजित पवार बोलत होते. विमानात असताना अजित पवार यांनी फोन केला होता, असं श्रीजीत पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या विमानाचा अपघात साधारण 8.46 वाजता झाला होता.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!