संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सेवादलाची बारामती शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या शहराध्यक्षपदी अॅड. धीरज माणिक लालबीगे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती शहर कार्यालयात आयोजित बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीस शहराध्यक्ष अॅड. किरण डिंगळे, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, नगरसेवक सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, विशाल हिंगणे, गौरख पारसे, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील काळे, जिल्हाध्यक्ष सचिन गुप्ता, जिल्हा महिला कार्याध्यक्ष ज्योती गाडे, बारामती शहर सेवदलाच्या महिला अध्यक्ष अनीता जाधव तसेच राष्ट्रवादी शहर कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) सूरज देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनिता अजितदादा पवार , राज्यसभा खासदार पार्थ पवार तसेच युवा नेते जय पवार यांच्या सूचनेनुसार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवदलाची ही बैठक पार पडली.
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे संघटन अधिक बळकट करून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अशी आहे बारामती शहर सेवदल कार्यकारिणी :
शहराध्यक्ष – अॅड. धीरज माणिक लालबींगे
उपाध्यक्ष – शरद धुमाळ, मोहन रणदिवेशहर
संघटक – सचिन भोसले, अॅड. रोहन कांबळे, गरीब नवाज शेख, वैभव व्हटकर
कार्यकारिणी सदस्य :
सचिन थोरात, शिवकांत गाडे, अॅड. धीरज गावडे, अॅड. ओमकार क्षीरसागर , हुसेन शेख, शिवाजी भिसे, ओम पाटोळे, अमोल गांधी, संतोष सावंत.









