पिंकी माळींच्या कुटुंबाला भेटायला गेले जय पवार, बिल्डिंगची लिफ्ट डगमगली, 18 मजले पायी उतरले


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं. या अपघातात प्रभादेवी येथील रहिवासी असलेल्या केबिन क्रू पिंकी माळी यांनाही प्राण गमवावे लागले.

सुरुवातीला रोहित पवार, त्यानंतर विविध मान्यवरांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतलेली पाहायला मिळालेली होती. याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी माळी यांची आई दाखल असलेल्या रुग्णालयात जाऊन विचारपूस केलेली होती. वि. के.सिंह यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याचे यावेळेस पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी आमदार अमोल मिटकरी यांना सांगितलेलं होतं.

पिंकी माळींच्या कुटुंबाची भेट

कालपर्यंत पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याकरिता अजित दादांच्या परिवारातून कुणीही गेलेले नव्हतं. अशातच काल जय पवार हे पिंकी माळी यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी सांत्वनपर भेटीला दाखल झाले. साधारणतः ते 5 वाजताच्या दरम्यान शिवकुमार माळी यांच्या इमारतीखाली पोहोचले. यावेळी बरेच सहकारी त्यांच्या सोबत होते.

माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवकुमार माळी यांचे घर प्रभादेवी येथील इमारतीत 18 व्या मजल्यावर आहे. लिफ्टच्या आत 18 व्या मजल्यावर जाताना जय पवार यांना लिफ्ट व्हायब्रेट करीत असल्याचे जाणवले. शेवटी जय पवार शिवकुमार माळी यांच्या घरी सुखरूप पोहोचले.

जय पवार जिन्याने उतरले

सांत्वनपर भेट झाल्यानंतर जय पवार माध्यमांना प्रतिक्रिया देत लिफ्टकडे जायला निघाले. यावेळेस पिंकी माळी यांचे भाऊ जय पवार यांच्यासोबत होते. पिंकी माळी यांच्या भावाने जय पवार यांना लिफ्टने खाली जाण्याचा आग्रह केलेला दिसला. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर वर लिफ्ट येत नसल्याने आणि अगोदरच जय पवार यांना वर येताना लिफ्ट व्हायब्रेट करत असल्याचे जाणवल्याने जय पवार यांनी सहकाऱ्यांसोबत 18 मजले खाली पायी उतरण्याचा निर्णय घेतला.

खाली जातांना लिफ्टमध्ये काही बिघाड झाल्यास कदाचित आपण लिफ्टमध्ये अडकू अशी शंका त्यांच्या मनात असावी. मात्र अजित दादा विमान दुर्घटनेनंतर पवार कुटुंबीय स्वतःची काळजी घेताना दिसून आले. अशाप्रकारे जय पवार पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. जय पवार यांच्या या कृतीची मात्र माध्यमांमध्ये चर्चा झालेली दिसून आली.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!