बारामती पोटनिवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा, पहा नेमकं काय म्हणाल्या ?


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलीय. खासदार सुप्रिया सुळेंनी पोटनिवडणुकीवरुन दिल्लीतील प्रेसमधून मोठी माहिती दिली.

बारामतीची पोटनिवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार का? सुनेत्रा पवार उमेदवार असल्यास विरोधात उमेदवार देणार का याबाबतही सुळेंनी मोठी घोषणा केलीय. त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घेऊयात..

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडून सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. ती पोटनिवडणूक अर्थातच आम्ही लढणार नाही. महाविकास आघाडीचा विचार देखील तसाच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही. राहुरीच्या जागेबाबत जयंत पाटील साहेब काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलतील. आज किंवा उद्या राहुरीच्या जागेबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल. मात्र, बारामतीत आम्ही उमेदवार देणार नाही.

अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होतेय. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल तसा कार्यक्रमही जाहीर केला.23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. मिळालेल्या माहितीनुसार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. मात्र निवडणूक लागली तर सुनेत्रा पवारच बारामतीमधून रणांगणात उतरु शकतात.पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही केलीय. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे याकडे लक्ष लागलं होतं. मात्र ज्यांच्याकडून घोषणा होईल अशी चर्चा होती त्याच खासदार सुप्रिया सुळेंनी सगळं चित्र क्लिअर केलंय. पण खरंच सुनेत्रा पवार रिंगणात उतरतात की दुसऱ्या नावाची घोषणा करतात .याकडे लक्ष असेल… कारण यावरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुढची रणनीती ठरेल..


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!