बारामती नगरपालिका निवडणूक 2025 : आगामी नेतृत्व मा. बळवंत बेलदार पाटील 


बारामतीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून बारामती मध्ये पवार विरुद्ध पवार यांच्यात चांगलीच निवडणूक रंगणार आहे. राष्ट्रवादी मा. शरदचंद्रजी पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मा.बळवंत बेलदार यांनी आपल्या एका मुलाखतीत प्रभावी भूमिका मांडली. “निवडणुकीमध्ये धनशक्तीपेक्षा जनशक्ती जास्त महत्त्वाची असते… शेवटी जनशक्ती हीच सर्वात मोठी शक्ती!”या एका वाक्यातूनच त्यांच्या नेतृत्वाची दिशा आणि बारामतीसाठीची बांधिलकी दिसून आली.

मा.बळवंत बेलदार यांनी व्यक्त केलेला आत्मविश्वासदेखील ठळक होता. ते म्हणाले की “या वेळीदेखील मा. शरदचंद्रजी पवार गटाचाच नगराध्यक्ष असेल याचा मला पूर्ण विश्वास आहे.” मा.साहेब, ताई आणि मा.युगेंद्र दादांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी स्पष्ट केलं की ही संधी त्यांच्या साठी केवळ आनंदाची नाही तर मोठी जबाबदारीदेखील आहे.

बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी ते पुढील मुद्द्यांवर थेट कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं . ते म्हणाले – बारामतीचा विकास शेवटच्या थरापर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्न करेल . सध्या बारामती मध्ये कामाचे कॉन्ट्रॅक्ट फक्त ठराविक लोकांनाच दिले जाते एकाच रस्त्यासाठी खूप भरमसाठ पैसा घालवलेला आहे एकाच रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बनवण्यासाठी जवळपास 50 लाख खर्च केला आहे पण हाच पैसा सामान्य लोकांसाठी किंवा जे दलित लोक आहेत ज्यांना पाण्याच्या समस्या आहेत , आरोग्याच्या समस्या आहेत तर त्यांच्यासाठी खर्च करणं खूप गरजेचे आहे , त्याचबरोबर शिक्षणाचा विचार केला तर कमीत कमी खर्चात होतकरू लोकांना शिक्षण मिळावं यासाठी देखील प्रयत्न होतील . पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठते याच्यामुळे मच्छर होतात आणि रोगराई पसरते . आपल्याच बारामतीतील काही भागात म्हणजे जसं की उत्कर्ष नगर तिथे पावसाळ्यामध्ये खूप पाणी साचत तर त्यासाठी देखील आम्ही काम करू. खोळंबून राहिलेली सगळीच काम पूर्ण केली जातील. आणि एकूणच बारामतीचा विकास केला जाईल.

तसेच मुलाखतीदरम्यान त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत त्यांना “मलिदा गॅंग” असे संबोधले आणि सांगितले की,“धनशक्तीवर नव्हे तर जनतेच्या विश्वासावर आमचा विजय निश्चित आहे.”प्रचार मोहिमेला लवकरच सुरूवात ताई आणि मा. युगेंद्र दादांच्या उपस्थितीत प्रचारमोहीम सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एकूणच, या मुलाखतीतून मा. शरदचंद्रजी पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. बळवंत बेलदार यांनी विकास, पारदर्शकता आणि सामान्य बारामतीकरांच्या समस्यांना प्राधान्य देणारी दिशा स्पष्टपणे मांडली आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!