पुण्यात धक्कादायक घटना! पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – (1 एप्रिल)१५ वर्षाच्या मुलीला घरात एकटं पाहून बापाची नियत फिरली. पोटच्या मुलीला धमकावले अन् नराधम बापाने बलात्कार केला.

पुण्यातील चाकण दावडमळा परिसरात नात्याला काळिमा फासणारी ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. बापाच्या अत्याचारानंतर मुलीने हिम्मत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् तक्रार दिली. १५ वर्षाच्या मुलीचे शब्द ना शब्द ऐकल्यानंतर पोलिसही हादरून गेले. त्यांनी तात्काळ नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

चाकण दावडमळा परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने चाकण पोलीसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्याने आरोपी वडिलाला तात्काळ अटक केली आहे. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिला धमकावून जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणात सर्वात धाडसी बाब म्हणजे, १५ वर्षीय पीडित मुलीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

सध्या आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (बालकांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.ही घटना उघडकीस आल्यानंतर चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सामाजिक संघटनाही या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पोलिस प्रशासनाकडे आग्रह धरत आहेत.या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांतडुन पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आली असून, वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!