समृद्धी महामार्गावर भीषण अपघात — रील बनवण्याच्या नादात चालकाकडून नियंत्रण सुटले; दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

समृद्धी महामार्गावर आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक अपघात घडला असून, या अपघातात दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुसदकडे जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स बस आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ पोहोचली होती. यावेळी बसचा चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले होते. याच निष्काळजीपणामुळे चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस समोरील कारवर जोरात आदळली.

या भीषण धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघातात दीड वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या अपघाताचे कारण समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजी वर्तनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!