बारामतीत सुनेत्रा पवारांचा ‘ऐतिहासिक’ विजय ? एक्झिट पोलचा अंदाज


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती:( ता .29 )राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले होते.

या पार्श्वभूमीवर, ‘रिंगसाईड रिसर्च’ या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या अंदाजानुसार, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सत्ताधारी पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र लोकशाहीच्या रिंगणात ही लढत अटळ ठरली. ‘रिंगसाईड रिसर्च’च्या आकडेवारीनुसार, बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना अक्षरशः डोक्यावर घेतले असून त्यांना ९२ ते ९७ टक्के इतके अभूतपूर्व मतदान मिळण्याचा अंदाज आहे.

जर हा अंदाज प्रत्यक्ष निकालात उतरला, तर महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील हे आजवरचे सर्वात मोठे रेकॉर्डब्रेक मताधिक्य ठरेल. इतर उमेदवारांच्या पारड्यात केवळ ३ ते ८ टक्के मते जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, सुनेत्रा पवार यांनी बारामतीचा बालेकिल्ला केवळ राखलाच नाही तर तो अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!