संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.१९ ऑगस्ट २०२६.
Baramati : बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना सोशल मीडियाद्वारे पाठवलेलं एक पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रात बारामतीमधील विविध समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच दादांच्या आकस्मित निधनामुळे बारामती पोरकी झाली अशी व्यथा देखील या पत्राद्वारे मांडण्यात आली आहे.
त्यामुळे जरा बारामतीकडे लक्ष द्या, असे आवाहन पवार कुटुंबियांना या पत्राद्वारे केले आहे. या पत्रात आणखी काय लिहलंय हे जाणून घेऊयात.
या पत्राद्वारे बारामती मधील गुन्हेगारी आणि इतर समस्या पवार कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर दादांच्या आकस्मित निधनामुळे बारामती पोरकी झाली अशी व्यथा देखील या पत्राद्वारे मांडण्यात आली आहे. बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे असं देखील या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांनी बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी विनंती देखील या पत्राद्वारे पवार कुटुंबीयांना करण्यात आली आहे.
काय लिहिलं आहे पत्रात …
आदरणीय पवार साहेब,
आदरणीय सुनेत्रा वहिनी,
आदरणीय सुप्रिया ताई,
पार्थ दादा, जय दादा
जरा बारामतीकडेही लक्ष द्या, ही नम्र विनंती.
दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने
पोरकी झाली आहे, आज बारामतीतील सामान्य नागरिक
अनेक प्रश्नांना सामोरे जात आहे.नगरपरिषदेचा कारभार अत्यंत असमाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. एखादा हुकुमशहा ज्या पद्धतीने सत्ता चालवतो, त्याच पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालवला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांच्या मनात
असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रगात असल्यासारखा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा आहे. बारामती ही केबळ एक राजकीय जागा नाही; ती शरद पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबांने वर्षानुवर्षे घडवलेली विश्वासाची भुमी आहे. म्हणूनच पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की,बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्दयावे.
जनतेचा आवाज ऐका …
त्यामुळे आता बारामतीच्या या खुल्या पत्रावर आता पवार कुटुंबियांतील नेते काय उत्तर देतात?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.








