संपादक – गणेश जाधव , प्रतिनिधि – रोहित माने
बीड:बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या घटना काही कमी होतांना दिसत नाही आहे.गेवराई तालुक्यातील नांदगाव ग्रामसेवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ग्रामसेवकाला करण्यात आलेली मारहाण एवढी जबर होती की ग्रामसेवकाच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले आहे. त्याचे शरीरी काळे-निळे पडले असून रक्तबंबाळ झाल्याचे दिसून आले आहे. मारहाण झालेल्या ग्रामसेवकाचा नाव जालिंदर सुरवसे असे आहे.लाथा बुक्यांसह लोखंडी रॉड आणि काठ्यांनी सुरवसे यांनी ही मारहाण केली.
ग्रामसेवकाला गावगुंडांनी का मारहाण केली याची माहिती समोर आलेली नाही आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रामसेवक जालिंदर सुरवसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सुरवसे यांची आई आणि बहीण यांच्या माध्यमातून तक्रार देण्यात आली आहे.









