ब्राझीलमध्ये निसर्गाचं तांडव! वादळी वाऱ्यामुळं ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ची प्रतिकृती कोसळली


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

दक्षिण ब्राझीलमधील रिओ ग्रांदे दो सुल राज्यात १५ डिसेंबर रोजी आलेल्या शक्तिशाली वादळी प्रणालीमुळे गुआइबा शहरात एक नाट्यमय घटना घडली. हॅवन मेगास्टोअरच्या बाहेर उभी असलेली स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची २४ मीटर उंच प्रतिकृती जोरदार वाऱ्यामुळे कोसळून पडली.

ही घटना सोमवार, १५ डिसेंबर रोजी घडली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BGatesIsaPyscho या हँडलवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा एका बाजूला झुकतो आणि क्षणार्धात जमिनीवर कोसळतो. पुतळा पडत असताना जवळच्या रस्त्यावरून वाहने जाताना दिसत आहे. तर, पुतळा पडताना पाहून काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत आपली वाहने दूर नेली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पुतळा एका फास्ट-फूड आउटलेटजवळ बसवण्यात आला. हा पुतळा हवान या प्रसिद्ध रिटेल चेनच्या मालकीचा होता. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा तो परिसर जवळपास रिकामा होता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरी संरक्षण विभागाने या भागात जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवत आधीच ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. रहिवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव खालील सूचना देण्यात आल्या होत्या.

हा पुतळा कोसळल्यानंतर नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तांत्रिक मूल्यांकनाचे आदेश दिले. पुतळा नेमका कोणत्या खरंच वाऱ्यामुळे पडला का? याचा शोध घेतला जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? यावरही प्रशासन भर देणार आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!