बारामतीत अजित पवार- सचिन सातवांवर करचोरीचा आरोप,अभिजीत कांबळेंचा निशाणा


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामतीत निवडणुकीची धुमाकूळ सुरू असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांना मात्र सवलत दिल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांनी केला आहे . कांबळे यांनी अनोखे पोस्टर छापत कर चोर, टॅक्स चोर अशा आशयाचा मजकूर छापला असून ते पोस्टर सोशल मीडियावर वायरल केले.

अभिजीत कांबळे यांनी बारामतीकरांना टॅक्स चोरांचे विकासाच्या नावाखाली हात मजबूत करण्यापेक्षा त्यांना धडा शिकवा असे आव्हान केले आहे. यावेळी कांबळे यांनी सर्वसामान्य लोकांची चोरी खपते आणि यांची लपते असे म्हणत अजित पवारांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधलाय.

ते म्हणाले की अजित पवार जरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असले तरी पण बारामती नगरपरिषदचे ते पहिल्यांदा नागरिक आहेत आणि नागरिक असून ते जळोची येथील सहयोग सोसायटी जी बारामती नगरपरिषद हद्दीमध्ये येते. त्या हद्दीमधील त्यांच स्वतःच घर आहे. उपविभागीय अधिकारी बारामती यांनी त्यांना दिनांक 24/05 2012 ला रहिवाशीसाठी सुधारित परवानगी दिली तर त्या परवानगीमध्ये काय दिलंय तर किमान अजित दादांना 7241 चौरस मीटर म्हणजे जवळजवळ 72 गुंठ्यामध्ये त्यांचं बांधकाम आहे आणि हा रिविजन उतारामध्ये फक्त 281 चौरस मीटर म्हणजे जवळजवळ पावणे तीन गुंट्यामध्ये अजित पवारांचे बांधकाम नगरपालिका दाखवते. म्हणजे आता कुठल्या मुख्य अधिकाऱ्याच्या सांगण्यावरन हे असं केलं जातं का क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरन चुकीची माप लावली जातात. कमीत कमी त्यांना सहा ते सात लाख रुपये वार्षिक घरपट्टी आकरायलाच पाहिजेत पण तसं न होता अजित आनंदराव पवार यांना घरपट्टी आहे 14823 रुपये . आता ह्याच्यामध्ये कर चोरी झाली नाही तर काय झाली .. तसंच सचिन सातव यांच्या रहिवाशी दाखवलेल्या जागेवर गाड्यांचे शोरुम आहे.रहिवासी परमिशन आहे पण बांधकाम आहे. शोरूमच हे पूर्णपणे रहिवाशी आहे पण त्याचा वापर कमर्शियल केला जातो. साधारणत रहिवाशी मध्ये आणि कमर्शियल टॅक्समध्ये किती फरक असतो पण तरी देखील त्यांना तेवढा टॅक्स आकारला जात नाही असे म्हणत अभिजीत कांबळे यांनी आरोप केले आहे.

हे पोस्टर पाहून बारामती मध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहेत. अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांनी केलेले हे आरोप खरे आहेत का आणि यावर अजित पवार आणि सचिन सातव काय उत्तर देणार याची सगळे वाट बघत आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!