बारामतीत युवकाचे मतदान आधीच झाल्याचा धक्कादायक प्रकार


संपादक – गणेश जाधव , प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती नगरपालिकेसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना बारामती शहरातील अहिल्यानगर देवी क्लब येथील मतदान केंद्रावर घडली आहे.या मतदान केंद्रावर मतदार अमित दिलीप कुलथे मतदानासाठी आले असता त्यांच्या नावावरचे मतदान आधीच झाल्याची नोंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे काही काळ एकच गोंधळ निर्माण झाला. आपण अद्याप मतदान केलेले नसताना आपल्या नावाने मतदान कसे झाले, याबाबत अमित कुलथे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सदर प्रकार लक्षात येताच निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. नियमानुसार अमित कुलथे यांच्याकडून ‘टेंडर वोट’चा फॉर्म भरून घेण्यात आला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली. मात्र, अमित कुलथे यांच्या नावाने यापूर्वी नेमके कोणी आणि कसे मतदान केले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही चूक तांत्रिक आहे की जाणूनबुजून करण्यात आलेला प्रकार आहे, याबाबत सध्या अनिश्चितता आहे.

या गंभीर घटनेबाबत मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाबाबत अधिक प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!