लोणावळ्यात पेरू विकणारी महिला बनली नगरसेविका


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

लोणावळा- पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात एक पेरू विकणारी महिली नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाली आहे. या विजयामुळे महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आहे. रोज पेरू विकून आपली रोजीरोटी चालवणारी, सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला आज लोकांच्या विश्वासावर नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. भाग्यश्री महादेव जगताप असं या विजयी उमेदवार महिलेचं नाव आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला . भाग्यश्री जगताप यांची निवडणूक लढवण्याची कहाणी ही कार्यकर्त्यांना आदर्श देणारी आहे. भाग्यश्री जगताप या सकाळ–दुपार पेरू विक्री करून संसाराचा गाडा हाकायचा आणि संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करायच्या. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या भाग्यश्री जगताप यांना 1468 मतं मिळाली. तर भारतीय जनता पार्टीच्या रचना विजय सिंनकर यांना 860 मतं मिळाली. 608 मतांनी भाग्यश्री जगताप विजयी झाल्या.आता त्यांचा हा संघर्ष, कष्ट आणि जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलला आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!