संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
नागपूर – मित्राचे लग्न ठरल्याने आयोजित केलेल्या मित्रांच्या एका मेजवानीत आदित्य मोहिते (वय ३३ वर्षे) याचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये एका फार्म हाऊसवर मेजवानी चालू असतांना आदित्य अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला; पण मित्रांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
ते तेथेच खात-पित बसले होते. मित्रांपैकी एक जण आधुनिक वैद्य असूनही त्याने त्याला तपसाले नाही. काही वेळाने मित्रांनी बेशुद्ध झालेल्या आदित्यला एका चादरीत गुंडाळून शेजारच्या खोलीत नेऊन ठेवले. त्यांची मेजवानी रात्रभर चालूच होती.
दुसर्या दिवशी सकाळी एका मित्राने आदित्यला उठवण्याचा प्रयत्न केला; पण तो हालचाल करत नसल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आदित्यच्या भावाने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ मित्रांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवला आहे. हे मित्र जामिनासाठी अर्ज करत असल्याचे समजते.








