पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी…!


संपादक-गणेश जाधव ,उपसंपादक -रोहित माने.

दि. 2 जुलै 2026.

पुणे | श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 7 जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान होणार आहे, यादृष्टीने ग्रामीण हद्दीत पालखी प्रस्थान सोहळा बंदोबस्त ११ ते १५ जुलै या कालावधीत असून पालखी मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल करुन ती पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी जारी केले आहेत.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम) : १५ जुलै रोजी पहाटे २ वा. ते रात्री २४ वा. पर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हा रोड बंद राहिल. सदरची वाहतूक भिगवण मार्गे बारामतील जाईल व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर -पुणे रोडला जातील.

बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम) :१६ जुलै रोजी पहाटे २ वा. ते २४ वा. पर्यंत जंक्शन ते बारामती हा वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथुन कळसमार्गे बारामती अष्टी वळविण्यात येत आहे. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.

रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वय समितीवर विलास लांडे यांची नियुक्ती

सणसर ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम) : १७ जुलै रोजी पहाटे २ वा. पासुन ते १८ जुलै रोजी रात्री २४ वा. पर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारीसर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर व बारामती-भिगण्वण-इंदापूर यामार्गाचावापर करतील. तसेच इंदापूर कडून बारामतीकडे जाणारी सर्व पकारची वाहने इंदापूर -बावडा-कळंब-बारामती व इंदापूर-भिगवन-बारामती यामार्गाचा वापर करतील.

निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) : १८ जुलै रोजी पहाटे २ वा. पासून ते रात्री २४ वा. पर्यंत निमगाव केतकीकडुन इंदापूरकडे जाणारीवाहतुक बंद राहील. इंदापूकडून जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळंब-जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी -देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे जातील.

इंदापूर : १९ जुलै रोजी पहाटे ४ वा. पासून ते रात्री २० वा. पर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक ही अकलुज-बावडा-नातेपुते-बारामती मार्गे जातील. अकलुज कडून बारामती व पुणे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. 19 जुलै रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, त्यावरील वाहतुक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविली जाईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम) : १९ जुलै रोजी पहाटे २ वा. पासून रात्री २४ वा. पर्यंत व २२ जुलै पासून पहाटे २ वा. पासून ते दुपारी १२वा. पर्यंत इंदापूर अकलुज रोडवरील वातुक पुर्णपणे बंद राहील. इंदापूर ते अकलुज या मार्गावरील वाहने इंदापूर -हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलुज या मार्गाचा वापर करतील. तसेच अकलुज ते इंदापूर यामार्गावरील वाहने यांनी अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गाचावापर करतील.

तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जितेंद्र डुडी यांनी केले आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!