संपादक- गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.२५ ऑगस्ट २०२६.
Rohit Pawar PA Daughter Baramati News : शनिवारी रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून बाहेर पडली.
बारामती : बारामती तालुक्यातील रुई येथील साई गणेश नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तसेच हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून बाहेर पडली. बराच वेळ ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. मात्र, रविवारी सकाळी घराजवळच तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुई येथील साई गणेश नगर परिसरात फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून घटनास्थळाची पाहणी आणि आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. मुलीच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार बारामतीत दाखल होणार आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध शक्यतांच्या आधारे तपास सुरू आहे.
मृत्यूचं गूढ कायम –
१२ वर्षीय मुलीचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. हत्या, आत्महत्या किंवा अन्य कारण याबाबत अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांमध्ये कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी पोलिसांच्या अधिकृत तपासाची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. फॉरेन्सिक तपास, शवविच्छेदनाचा अहवाल आणि पोलिस तपासातून या दुर्दैवी घटनेमागचं नेमकं सत्य समोर येणार आहे.
Related
बारामती : तालुक्यातील रुई येथील साई गणेश नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तसेच हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही.








