Baramati Accident: निंबूतजवळ भीषण मोटार अपघात – २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू


वडगाव निंबाळकर : नीरा- बारामती मार्गावर निंबूत (ता. बारामती) येथील मोटार अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. १) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.नीरा बाजूने मोटारीमधून (क्र.एमएच ४२ बीएस ४७८३) दोघेजण वडगाव निंबाळकरच्या दिशेने येत होते. निंबूत गावच्या हद्दीत लक्ष्मीनगरजवळ वाहनावरचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला मोटार धडकली.

यामध्ये आदित्य तानाजी चव्हाण (वय २१, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) याचा मृत्यू झाला. सहप्रवासी जखमी झाला असून, पुणे येथे उपचार घेत आहे.

शवविच्छेदन अहवाल आणि सहप्रवाशाचा जबाब नोंदविल्यावर अपघाताचे कारण कळून येईल, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!