‘आम्ही काय बांगड्या घातल्यात का?’ महेश लांडगे-अजित पवारांची पुणे-पिंपरीत कुस्ती


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारात महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यामध्ये कुस्ती रंगलीय. अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका, असा उल्लेख केल्याने संतापलेल्या महेश लांडगेंनी थेट अरे तुरे ची भाषा वापरलीय.

दुसरीकडे लांडगेंनी हातात बांगड्या घातल्या नाहीत, असं म्हणून महिलांचा अवमान केल्याची टीका रोहित पवारांनी केलीय. खरं तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलीय.मात्र महायुतीत असतानाही अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे थेट आरोप करत भाजपला चांगलंच घेरलंय.

25 वर्षांची राष्ट्रवादीची सत्ता भेदून 2015 मध्ये भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवडचा गड जिंकला. आता तोच गड ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसलीय. त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय. मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीनंतरही पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर भाजपला कौल देणार की अजित पवार गमावलेला गड पुन्हा जिंकणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!