संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – अजित दादा परत या…”, “अजित दादा अमर रहे…” अशा गगनभेदी घोषणा, हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि जनसागराच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अवघा महाराष्ट्र आज सुन्न असून निःशब्द आहे. आज आपल्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे डबडबले होते.
अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्र होते.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, निलम गोऱ्हे, आदिती तटकरे यांनीही आपल्या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप दिला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह विविध राज्यांतील मंत्री आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पुर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले








