सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री? पडद्यामागील घडामोडींना वेग


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार केल्यानंतर अजित पवारांच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच एक मोठी घडामोड बारामतीमधून समोर येत आहे.

लाखो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये जय पवार आणि पार्थ पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मुखाग्नी दिल्यानंतर पडद्यामागे राजकीय घडामोडींनी सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यासंदर्भात हलचाली सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांकडे असलेलं उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे सोपवायचं याबद्दल अजित पवारांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एक व्यक्तीचशी चर्चा केली आहे.

अत्यंसंस्कारानंतर राजकीय घडामोडींना वेग

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी अशी गळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांचा विचार केला जावा असा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर ठेवण्यासंदर्भात या नेत्यांची चर्चा झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या तरी उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारंचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. खरोखरच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

उत्तराधिकारी कोण?

अजित पवारांची पक्षावरील आणि संघटनेवरील पकड लक्षात घेता त्यांचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आवाहनही राष्ट्रवादीसमोर आहे. असं असतानाच पक्षाची सगळी सूत्रंही सुनेत्रा पवारांकडे सोपवलं जावं असं जनतेचं म्हणणं असल्याचं पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हीच इच्छा मंत्र्यांचीही असल्याचं बोलून दाखवलं आहे. अगदी बारामतीमधील नागरिकांबरोबरच सर्वसामान्य जनेतेचीही अशी इच्छा आहे की वहिनींना (सुनेत्रा पवारांना) राजकारणात आणावं, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातून सगळेजण म्हणतात की…

“आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच,” असल्याचंही झीरवाळ म्हणालेत. “आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथून पुढे एकत्रच असणार यात शंका नाही,” असंही झीरवाळ यांनी नमूद केलं आहे. “अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात,” असं झीरवाळ यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे,” असं नरहरी झीरवाळ म्हणाले आहेत. “सगळे बारामतीकर म्हणतीलच म्हणतील पण महाराष्ट्रातून सगळेजण म्हणतात की वहिनींना आता सत्तेत आणलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेकडून होतेय विनंती तशी आमची विनंती आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीलाच एकत्र आले होते. काही ठिकाणी टोकाचा विरोध झाला होता पण आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही,” असंही नरहरी झिरवळ म्हणाले आहेत. मात्र आता राष्ट्रवादीमध्ये घेतले जाणारे निर्णय हे सर्वानुमते घेतले जातील आणि त्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल असं सांगितलं जात आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!