लेकीचे लग्न जुळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मुलगी रेवती सुळे यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याबरोबर रेवती विवाहबंधनात अडकणार आहेत.

दरम्यान हे लग्न जुळवण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा सुरू होती. या चर्चांबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनीच खुलासा केला आहे.

सुप्रिया सुळे सोशल मीडियावर केलल्या पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या की, “सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती हिचा विवाह अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचा सुपूत्र सारंग याच्याशी निश्चित झाला आहे.”

मुख्यमंत्री मध्यस्थी केली?

मुलीच्या लग्नात मुख्यमत्र्यांनी मध्यस्थी केली अशी चर्चा आहे असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला, ज्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. तसेच त्यांनी या लग्नाची घोषणा ३० तारखेला होणार होती असेही सागितले. “खरंतर अनेक महिने ही चर्चा चालली होती. रेवती आणि सारंग हे जवळपास गेले वर्षभर एकमेकांना ओळखतात. माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ, म्हणजे मला सहा भाऊ आहेत, त्या सहाही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिला आहे. मी माझं भाग्य समजते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरंतर दुर्दैव हे आहे की दादा आपल्यातून २८ तारखेलाच गेला, नाहीतर ही घोषणा सगळं कुटुंबच ३० तारखेला करणार होतं,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“एकाच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच हे लग्न ठरलं आहे,” असेही सु्प्रिया सुळे म्हणाल्या.कोण आहेत सुप्रिया सुळेंचे होणारे जावई?

सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे. सारंग लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. पाणी शाश्वत प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासात ही कंपनी कार्यरत आहे. गेल्या आठ वर्षांपासून सारंगही या कंपनीचं काम पाहत असून ते कार्यकारी संचालक पदी आहेत. कौटुंबिक व्यवसायात सक्रिय होण्याआधी त्यांनी बिझनेस डेव्हलोपमेंट कन्सल्टंट म्हणून मॉडर्न हायड्रोजन कंपनीत काम केले आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!