फेब्रुवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज तर तुम्ही कोणतेही महत्त्वाचे बँकिंग काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. कारण, अनेक राज्यांमधील बँक शाखा आजपासून, म्हणजेच २८ फेब्रुवारीपासून आणि मार्चच्या सुरुवातीपासून सलग 5 दिवस बंद राहणार आहे.
म्हणून, बँकेत जाण्यापूर्वी बँक सुट्टीची यादी एकदा बघा आणि त्यानंतर आपले नियोजन करा.
बँक आज सुरू की बंद?
बँकांच्या सुट्ट्यांचा 5 दिवसाची सुरुवात शनिवार, २८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे २८ फेब्रुवारी, या महिन्याचा चौथा शनिवार असल्याने, देशभरातील बँका बंद राहतील. त्यानंतर, रविवार, १ मार्च रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.
होळीसाठी बँका कोणत्या दिवशी आणि कुठे बंद?
वेगवेगळ्या राज्यांमध्ये होळीचा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, त्यामुळे शहरानुसार सुट्ट्या निश्चित केल्या जातात.
२ मार्च (होळी दहन) – या दिवशी लखनऊ आणि कानपूर मुख्य ऑफिस असणाऱ्या बँकांच्या शाखा बंद राहतील.
३ मार्च (धूलिवंदन आणि डोल यात्रा) – धूलिवंदन आणि डोल जत्रेनिमित्त देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये महाराष्ट्र), मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, तेलंगाना, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गोवा, बिहार, झारखंड, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
४ मार्च (होळीचा दूसरा दिवस) – होळीच्या दुसऱ्या दिवशी त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, छत्तीसगड, मेघालय आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बँका बंद असतील.
डिजिटल बँकिंग सुरू
या 5 दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी बँक शाखा बंद असल्या तरी तुमच्या बँकिंग सेवा सुरू राहतील.
सुट्टीच्या काळात UPI आणि नेट बँकिंग चालू राहतील.
तुम्ही मोबाईल बँकिंग आणि UPI द्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता.
याव्यतिरिक्त, ATM सेवा चालू राहतील.
तुम्ही तुमची सर्व बिले ऑनलाइन देखील भरू शकता.
बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलत असल्याने, घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहराची स्थिती RBI यादीवर किंवा तुमच्या बँकेच्या अॅपवर तपासा. जर तुम्हाला मोठा चेक पास करायचा असेल किंवा ड्राफ्ट जारी करायचा असेल, तर कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीनंतर त्याचे नियोजन करा.









