वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या ‘त्या’ महिलेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

ता. 22 – मुंबईत भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी (दि.21) ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. मात्र, या मोर्चामुळे शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्यातूनच एक अनपेक्षित प्रकार घडला.

वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा शाळकरी मुलगा अडकून पडला होता. मुलाला घरी घेऊन जाण्यात अडचणी येत असल्याने संबंधित महिला संतापली आणि थेट मोर्चात घुसून आंदोलनकर्त्यांना जाब विचारू लागली. “हा मोर्चा मैदानात घ्या, रस्त्यावर का?” असा सवाल करत तिने जोरदार संताप व्यक्त केला. यावेळी तिने मंत्री गिरीश महाजन यांनाही “Get out” म्हणत खडेबोल सुनावले. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.या घटनेनंतर दिवसभर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात या संतप्त महिलेचीच चर्चा रंगली.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, हे आम्ही मान्य करतो. संबंधित महिला अत्यंत संतप्त होत्या आणि त्यांनी आक्षेपार्ह भाषेत प्रतिक्रिया दिली. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही संयमाने परिस्थिती हाताळली. पोलिसांना देखील त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास सांगितले. 10-15 मिनिटांत रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र, बाटली फेकणे किंवा अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. भविष्यात मोर्चाचे नियोजन करताना अधिक काळजी घेतली जाईल.”अस ते म्हणाले


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!