आज 1 वाजता लागणार बारावीचा निकाल.. निकाल कुठे आणि कसा बघायचा?


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

दि.2 मे – महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज, 2 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12 वी) चा निकाल जाहीर करणार आहे.

मागील काही दिवसांपासून 12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत चर्चा होती. काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एचएससी निकालाची तारिख आणि वेळ जाहीर केली आहे. पण हा निकाल कोणत्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12 वीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला जाणार आहे, या 2 तारखेला 1:00 वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार यासंदर्भात जाणून घ्या.

कुठे पाहाल निकाल?

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाइट्सवर आपला निकाल पाहू शकतात:

mahresult.nic.in

results.gov.in

results.nic.in

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा.

त्यानंतर होमपेजवरील ‘HSC Result 2025’ या लिंकवर क्लिक करा.यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका.‘View Result’ किंवा ‘Submit’ बटणावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तिथून तुम्ही तुमची मार्कशीट डाउनलोड किंवा प्रिंट देखील करू शकता.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!