ठाकरेंच्या ६ खासदारांचं बंड, पण नोटीस फक्त ५ जणांनाच! मातोश्रीचा आशिर्वाद अन् ठाकरे गटाचा गेम प्लॅन काय?


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने,

18 जून 2026

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या खासदारांवर अखेर पक्षाकडून अधिकृत कारवाईची पहिली पाऊल उचलण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या वतीने पक्षादेश (व्हीप) धुडकावणाऱ्या फक्त पाच खासदारांना ‘कारण दाखवा’ (Show Cause) नोटीस बजावण्यात आली आहे.

दिल्लीतून या नोटीस जारी करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, यामध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. ठाकरे गटाने वप बजावलेल्या बैठकीकडे ६ खासदारांनी पाठ फिरवली. मात्र, त्यापैकी ५ खासदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नेमकं काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

ऑपरेशन टायगरची कुणकुण लागताच ठाकरे गटाकडून हालचालींना वेग आणला गेला. ठाकरे गटाने तातडीने व्हीप बजावत पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकसभेच्या ९ पैकी ६ खासदारांनी पाठ फिरवली. तर, फक्त ३ खासदार ठाकरेंसोबत कायम राहिल्याचे दिसून आले. या बैठकीनंतर ठाकरे गट कायदेशीर कारवाई करणार हे जवळपास स्पष्ट झाले होते.

पक्षाने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या अधिकृत बैठकीला हे खासदार उपस्थित राहिले नव्हते. व्हीप बजावूनही अनुपस्थित राहिल्याने पक्षाने या बंडखोर खासदारांना कडक शब्दांत जाब विचारला. “पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन का केले? तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये?” अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

तुळजाभवानी आणि ठाकरेंचा आशीर्वाद कोणाला?

या संपूर्ण राजकीय भूकंपामध्ये आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, आगामी निवडणुकीच्या तोंडावर ‘आई तुळजाभवानी’ आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरा आशीर्वाद नेमका कोणाला मिळणार? एकीकडे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले शिवसैनिक आणि दुसरीकडे बंडखोरीच्या पवित्र्यात असलेले खासदार, यांच्यातील कायदेशीर लढाई आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ठाकरे गटाकडून पाच जणांना नोटीस धाडण्यात आली. त्यामुळे तो सहावा खासदार कोण? प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सहापैकी पाच खासदारांना थेट नोटीस धाडण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा नोटीस न धाडलेला सहावा खासदार कोण, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!