मी माझ्या मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, प्रकरणात मोठा ट्विस्ट


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

इंदापूर -जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan) परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची चर्चा होती.

विशेष म्हणजे, तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, याप्रकरणाला वेगळंच वळण मिळालं असून मुलीने स्वत: व्हिडिओ बनवून याबाबत माहिती दिली. माझे संबंधित मुलासोबत (Lovestory) प्रेमसंबध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याने या घटनेत ट्विस्ट पाहायला मिळाला.

भिगवणमधून मुलीचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी याबाबत सविस्तरपणे माहिती दिली, त्यानुसार मुलगा आणि मुलगी दोघेही फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात होते. त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित झाला होता. त्यातच, आता तरुणीने स्वत: व्हिडिओ बनवून माझे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले.

माझे प्रेमसंबंध, मी माझ्या मर्जीने आले

माझे आणि त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत, त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मला केली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे, अशी माहिती मुलीने व्हिडिओच्या माध्यमातून दिली. दरम्यान, मुलीकडून व्हिडिओ आल्यानंतर पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप यश आले नाही.

दरम्यान, अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावर अपहरणाचा आरोप आहे त्या तरुणामधे मागील दिड महिन्यात अकरा वेळा संपर्क झाला आहे. यातील तीन वेळा अपहरणाचा आरोप असलेल्या मुलाने मुलीला फोन केला असून आठ वेळा मुलीने मुलाला एसएमएस केले आहेत. आरोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशीरा केलेले आहेत. या तीन कॉलचे ड्युरेशन अवघे तीन ते पाच सेकंद इतकेच आहे. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये व्हॉटसॲप कॉल सुरू झाले आहेत. या व्हॉटसॲप कॉलचे डिटेल्स आणि व्हॉटसॲप चॅटचे डीटेल्स मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!