FIR वरून बारामतीत तणाव! रोहित पवारांचा पोलिसांवर थेट आरोप, “दादांना न्याय द्यायला आम्ही १० वर्ष थांबू का?”


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामतीत आज पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती पोलिस स्टेशन येथे पोलिसांशी जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, कालच मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथेही रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली होती. सलग दोन दिवस पोलिस ठाण्यातील या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.

बारामतीत आज पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती पोलिस स्टेशन येथे पोलिसांशी जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कालच मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथेही रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली होती. सलग दोन दिवस पोलिस ठाण्यातील या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी रोहित पवार यांची तक्रार लेखी स्वरूपात स्वीकारली आहे; मात्र गुन्हा नोंदवण्यास म्हणजेच एफआयआर दाखल करण्यास नकार दिला आहे. यामुळे रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. “आमची केस खोटी आहे, आमचा एफआयआर खोटा आहे असं स्पष्ट सांगा. आम्हाला एफआयआर द्या. नाहीतर मी खोटा एफआयआर करतोय म्हणून माझ्यावरच कारवाई करा,” अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिलं.

रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार, काही स्थानिक नेते आणि वकिलांचा देखील पोलिस ठाण्यात सहभाग होता. सर्वांनी मिळून पोलिसांना काही मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस तक्रार नोंद करून घेतील, पण गुन्हा दाखल करणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो तक्रार घेतली जाते, पण एफआयआर का नाही?

या संपूर्ण प्रकरणाचा संबंध कथित विमान अपघाताशी जोडला जात आहे. रोहित पवारांनी पोलिसांसमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. “एक महिना झाला, सीआयडीकडून एक तरी स्टेटमेंट आलं का? सीआयडीने कोणाला बोलावलं का? त्या कंपनीचा मालक रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत बसला, त्याला कोणी चौकशीसाठी बोलावलं का? व्ही के सिंग जो मालक आहे, त्यालाही बोलावलं नाही. विमानाचं मेंटेनन्स करणाऱ्या व्यक्तीला बोलावलं नाही. आतापर्यंत फक्त सीसीटीव्ही गोळा केलेत. विमानात जे पायलट येणार होते ते अचानक कॅन्सल झाले, का झाले? त्यांना कोणी विचारलं का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

रोहित पवारांनी डीजीसीएच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला. “डीजीसीएच्या कोणत्या अधिकाऱ्याने या सर्व प्रक्रियेला मंजुरी दिली?” असा थेट प्रश्न त्यांनी केला. तसेच त्यांनी असा आरोप केला की, संबंधित व्हीएसआर कंपनीचे आणि डीजीसीएचे काही व्यावसायिक संबंध असल्यामुळे काही जण कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. “जर तुम्ही व्हीएसआरविरोधात एफआयआर घेत नाही, तर तुम्हीही त्यांना वाचवत आहात का?” असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, “आम्ही जे प्रेझेंटेशन केलं, त्यातील माहिती आमच्या पातळीवर मिळालेली आहे. जनतेला तर अजूनही काहीच माहिती नाही. चुका असतील तर कोणी काउंटर केलं का? केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्र्यांच्या मंत्रालयालाही आम्ही माहिती पाठवली आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, हा विषय केवळ तांत्रिक किंवा अपघाताचा नसून पाच जणांच्या मृत्यूचा आहे आणि त्याची क्रिमिनल चौकशी होणं गरजेचं आहे.

“अपघाताची एफआयआर दाखल करा आणि प्रकरण सीआयडीकडे वर्ग करा, एवढीच आमची मागणी आहे,” असं ते म्हणाले. सीबीआयकडे हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचा दाखला देत त्यांनी प्रश्न केला, “७ हजारांहून अधिक केस प्रलंबित आहेत, २६०० केस दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. दादांना न्याय द्यायला आम्ही दहा वर्ष थांबू का?” एकीकडे पोलिस प्रशासन आपली भूमिका स्पष्ट करत नसताना, दुसरीकडे रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. या प्रकरणामुळे बारामतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता पोलिस गुन्हा दाखल करणार का? प्रकरण सीआयडी किंवा इतर तपास यंत्रणेकडे वर्ग होणार का? आणि रोहित पवार पुढे कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!