संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर व्हीएसआर कंपनीशी संबंधित पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा धक्कादायक व्हिडीओ जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.
जय पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, “माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो – या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी…” हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करत शेअर जय पवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
ही वेदना आयुष्यभर साथ देणार: जय पवार
जय पवार यांनी आपल्या पोस्टची सुरुवात अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत केलीय. त्यांनी म्हटले की, “माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे.” पितृछत्र हरपल्याचे दुःख व्यक्त करतानाच त्यांनी विमान अपघातास कारणीभूत ठरू शकणाऱ्या तांत्रिक आणि मानवी त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.









