संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती : आमराई परिसरातील प्रभाग क्र. १४ मधील कोअर हाऊस येथील अंतर्गत रस्ते बांधकाम करण्याची मागणी अखेर मार्गी लागली आहे. या संदर्भात दि. ६ मार्च २०२५ रोजी RPI (आठवले) पक्षाच्या वतीने बारामती नगरपरिषदेकडे लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करण्यात आला.
सदर मागणीच्या अनुषंगाने नगरपरिषदेकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचा आदेश देण्यात आला असून आज म्हणजेच 3 मार्चला नारळ फोडून रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी मा.रविंद्र(पप्पू)सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPIआठवले)मा. सुनील शिंदे (सचिव प.महाराष्ट्र)मा.रत्नप्रभा ताई साबळे (म. उपाद्यक्षा प. महाराष्ट्र)मा.संजय वाघमारे(तालुका अद्यक्ष)मा.मोईन बागवान,मा. गणेश मागाडे,मा.अनुराग कीर्तिकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांसह मा. वनिता ताई खुडे, मा. वाडेकर ताई यांच्यासह स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.
सदर रस्त्याची मागणी मान्य करीत प्रत्यक्षात रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने मा.सचिनजी सातव(नगराध्यक्ष बारामती शहर)मा.अमरजी धुमाळ(सभापती बांधकाम विभाग)मा.पंकजजी भुसे(मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद) यांचे आभार मानत उर्वरित रस्त्यांच्या कामासहित विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामाकरिता बारामती नगर परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येईल असे मा. रविंद्र(पप्पू)सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले.









