संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – सातबारा उतार्यावर भूमीची नोंद करण्यासाठी शेतकर्यांकडून लाच स्वीकारतांना मध्यस्थी सोमनाथ संपत महानवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तहसीलदार कार्यालयातील तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या नावे त्यांनी लाच मागितली होती.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाच देणे मान्य नसलेल्या शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदार शेतकर्याची निंबूत येथे ६ गुंठे भूमी असून त्याची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्याची नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी त्यांनी निंबूत तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या कार्यालयात वावर असणारा मध्यस्थी आरोपी महानवर यांनी नोंद करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
ही मध्यस्थी करणारी व्यक्ती कुणाच्या आश्रयाने काम करत होती, याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे !त्याला तलाठी कार्यालयाची मूकसंमती होती का? हेही पहाणे आवश्यक !







